पतसंस्थेचे नूतन चेअरमन नागेश बेर्डे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सदिच्छा भेट

रत्नगिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेचे नूतन विद्यमान चेअरमन नागेश बेर्डे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांची सदिच्छा भेट घेतली.
पतसंस्थेचे चेअरमन नागेश बेर्डे यांनीमुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी पतसंस्थेला जिल्हा परिषद रत्नागिरीच्या जुन्या इमारतीमध्ये भाडे तत्वावर जागा मिळावी याबाबतचे निवेदन पत्र दिले. तसेच पतसंस्थेच्या सभासदांची कार्यालयांकडून विलंबाने येणा-या वसुलीबाबतची समस्या सांगितली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागेश बेर्डे तसेच उपस्थित संचालक यांना पतसंस्थेच्या या मागण्यांबाबत विचार करण्याचे तसेच पतसंस्थेची वसुली वेळेवर पाठविली जाणेबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी चेअरमननागेश बेर्डे यांचेसोबत नवनिर्वाचित संचालक संतोष गमरे, संतोष कांबळे, श्रीमती मंजिरी वाडेकर तसेच पतसंस्थेचे सेक्रेटरी महेंद्र कांबळे हे उपस्थित होते.