सावंतवाडी । प्रतिनिधी :
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ५० वी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती बैठक, २०२२ चा उद्घाटन समारंभ कार्यक्रम दिनांक १४ डिसेंबर, २०२२ संपन्न झाला. या कार्यक्रमास मा. ना. श्री. अब्दुल सत्तार, कृषि मंत्री तथा प्रति उपकुलपती, कृषि विद्यापीठ हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमास मा. श्री. एकनाथ डवले (भाप्रसे), अपर मुख्य सचिव (कृषि), महाराष्ट्र राज्य तसेच मा. श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे) महासंचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे, मा. डॉ. संजय सावंत, कुलगुरु डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरु, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, मा. डॉ. इन्द्र मणी, कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, मा. डॉ. शरद गडाख, कुलगुरु डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला तसेच चारही विद्यापीठाचे संशोधन, शिक्षण, विस्तार संचालक उपस्थित होते. या प्रसंगी चारही कृषि विद्यापीठामध्ये उत्कृष्ट संशोधन केलेल्या संशोधकांना उत्कृष्ट कृषि संशोधन केलेल्या संशोधकांना उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली कार्यरत असलेले डॉ. रमेश लक्ष्मण कुणकेरकर, प्रमुख, कृषि वनस्पतीशास्त्र विभाग यांनी केलेल्या भरीव संशोधनात्मक कार्याबदल त्यांना उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. कुणकेरकर हे २८ वर्षे विद्यापीठांच्या अविरत सेवेत असून त्यांनी भात पिक, नाचणी, वरी, भुईमुग या पिकांमध्ये उल्लेखणीय संशोधन कार्य केले आहे. विविध पिकाच्या विविध गुण वैशिष्टये असलेल्या १५ सुधारीत आणि संकरीत जाती प्रसारित करुन पी.पी.व्ही. एफ. आर. ए. कडे नोंदणी करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. तसेच संकरीत व सुधारीत भात बिजोत्पदान घेण्याकरीता शेतकरी महाबीज, खाजगी कंपन्या यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी पदव्युत्तर ५ विद्यार्थ्यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले आहे. तसेच विविध शास्त्रीय संस्थाचे आजीव सदस्य आहेत. त्यांनी ३ पुस्तके आणि विविध पुस्तकांमधील अध्यायांचे लेखन केले आहे. त्यांनी ४३ शास्त्रीय संशोधक लेख, ९८ तांत्रिक लेख आणि ३६ विविध नियतकालीकामध्ये संशोधन लेख लिहीले आहेत, ९ दूरदर्शन आणि ३६ आकाशवाणी कार्यक्रमातून शेतकरी कृषि विस्तारक यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या कार्यकालावधीमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय ८ प्रकल्पांचे मुख्य व उप समन्वयक म्हणून कार्य केले आहे. डॉ. कुणकेरकर यांना कै. मुकुंद दांडेकर, आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्कार, कै. वसंतराव नाईक प्रेरणा पुरस्कार, उत्कृष्ट संशोधन लेख, उत्कृष्ट भिंती पत्रिका, सर्वोउत्कृष्ट तांत्रिक लेख पुनरावलोकन इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांना मिळालेल्या ‘उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार, २०२२’ करीता त्यांचे सर्व स्तरांवरुन कौतुक करण्यात येत आहे.
Sindhudurg