राजीवडाकडे जाणार्‍या रस्त्यावर गांजासह दोघे सापडले

रत्नागिरी ः प्रतिनिधी : शहरातील निवखोल ते राजीवडा जाणार्‍या रस्त्यावर बेकायदेशिरपणे 100 ग्रॅम गांजा आपल्या ताब्यात बाळगलेल्या दोन संशयितांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई बुधवार 12 जुलै रोजी करण्यात आली.
सलमान नाझीन पावसकर आणि जिब्रन बशिर भाटकर (दोन्ही रा.निवखोल,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.बुधवारी शहर पोलिस गस्त घालत असताना त्यांना हे दोघे आपल्या ताब्यात 2055 रुपयांचा 100 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य बाळगून असताना मिळून आले.त्यांच्याविरोधात एन.डी.पी.एस अ‍ॅक्ट 1985 चे कलम 8 (क),27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.