मुलींमध्ये सहकार भावना निर्माण करा- सौ स्वप्ना यादव

चिपळूण (प्रतिनिधी) : माझ्या वडीलांनी मला प्रोत्साहित केले. आपण देखील आपल्या मुलींना प्रोत्साहन द्या. त्या चमकदार कामगिरी करतील. त्यांच्या मनात सहकार भावना निर्माण कारा, असे मत चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना यादव यांनी व्यक्त केले. डीबीजे महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षा तर्फे विद्यार्थिनींसाठी ‘आई- पहिला गुरु ‘या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध झाडांची रोपे तयार करून आणली होती ती रोपे आपल्या आईला भेट म्हणून दिली. यावेळी चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी मंचावर प्राचार्य बापट सर उपप्राचार्य तळपसर सौ.संध्या तांबे विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या.
महिला विकास कक्ष समन्वयक सौ. दिशा दाभोळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यामध्ये महिला विकास कक्षा तर्फे वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. आई मुलींचा हा मेळावा आहे. आई हा आपला पहिला गुरु असतो. तिच्याबद्दल आपण कृतज्ञता असणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. प्रा. लीला बिरादार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी बोलताना यादव यांनी ‘आई -पहिला गुरु’ या विषयी मला या ठिकाणी बोलायला निमंत्रित केले त्याबद्दल महाविद्यालयाचे धन्यवाद मानले. मुलीने पुढे येऊन आत्मपरीक्षण करून स्वतःचे व्यक्तिमत्व बनविले पाहिजे. आई आणि मुलीचं नातं हे निकोप असायला पाहिजे. आईने मुलींचे मोकळेपणाने बोलले पाहिजे .अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. उपप्राचार्य प्रा. तळपसर यांनी आपल्या मुलीच्या वर्तनाकडे बारीक लक्ष असले पाहिजे अशा भावना व्यक्त केला. तर प्राचार्य बापट सर यांनी उत्तम नागरिक घडवणे ही समाजाची गरज आहे. अशा प्रकारचे उपक्रम यात भर घालतात अशा भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका सौ.स्नेहल कुलकर्णी, प्रा. सुचिता दामले, प्रा.सौ. प्राची जगताप, सौ. कांचन चिले, प्रा.सौ. रूपाली दांडेकर, श्रीमती नम्रता माने, प्रा.सौ.अर्पिता पालशेतकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. मृण्मयी सोहनी यांनी केले तर आभार प्रा.सौ अमिता कारंडे यांनी केले.