चिपळूण – तालुक्यातील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडी अम स्कूलमध्ये दिनांक 11 जुलै 2023 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या माध्यमिक विभागातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी राजेश माटे हिच्या उत्तम अशा भाषणाने झाली. त्यानंतर आठवी व नववीच्या काही विद्यार्थ्यांनीही जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व सांगितले. त्यावेळी प्रशालेच्या ॲडमिनिस्ट्रेटर सौ.पल्लवी सारोळकर आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.केदार शेंडे उपमुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे , सैा. रश्मी पाध्ये , सर्व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेचे क्रीडा शिक्षक आणि स्काऊट गाईडचे मुख्य श्री. प्रवीणकुमार आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट , गाईडच्या विद्यार्थ्यांनी लोकसंख्या निर्मुलन विषयावर घोषवाक्य तयार करुन लोकसंख्या दिनाचे महत्व पटवून दिले.
या कार्यक्रमाचे नियोजन हे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार इयत्ता नववीतील विद्यार्थीनी कुमारी वेदिका माणिक पाटील हिने मानले.
अशाप्रकारे या कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व पदाधिकारी, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.
Home महाराष्ट्र रत्नागिरी सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये जागतिक लोकसंख्या दिन साजरा .