कणकवली : महाराष्ट्र गोवा राज्यासह कर्नाटक राज्यात घरफोडीचे ४५ गुन्हे असलेल्या मूळ गोवा येथील फरार आंतरराज्य गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील ( वय ३७) याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कणकवली तालुक्यातील वागदे येथील तो राहत्या घरातून अटक केली होती. दरम्यान कणकवली पोलिसांनी आरोपी प्रकाश विनायक पाटील याला कणकवली येथे न्यायालयासमोर हजर केले असता त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले.