संरबळ येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान

भक्ष्याच्या शोधात धावताना अंदाज न आल्याने पडला विहिरीत

वेंगुर्ले : प्रतिनिधी
सरंबळ परबवाडी येथील नंदकुमार नारायण परब यांच्या विहीरी मध्ये पडलेल्या वन्यप्राणी बिबट्या ला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने योग्य पद्धतीने पिंजऱ्यात पकडून जीवदान दिले आहे.आज १३जुलै २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता च्या सुमारास बिबट्या आपल्या विहिरीत पडला असल्याचे परब यांना दिसले. तात्काळ त्यांनी त्याबाबत स्थानिक वनकर्मचा-यांना माहिती दिली असता वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने तत्परतेने घटनास्थळी दाखल होत २० ते ३० फूट खोल विहिरीतून वन्यप्राणी बिबट्या यास सुखरूप बाहेर काढले. तत्पूर्वी जांभा दगडाचे बांधलेल्या या विहिरीत चढण्यासाठी असलेल्या पायरीचा आधार घेत बिबट्या थांबून होता.नर जातीचा हा ३ ते ४ वर्षे वयाचा हा बिबट्या भक्ष्याच्या मागे धावताना अंदाज न आलेने या विहिरी मध्ये पडला असावा असे वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री.संदीप कुंभार यांनी सांगितले.

दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच माहिती वनविभागाला देऊन बचाव कार्यास देखील मदत केल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची १ मध्ये समाविष्ट अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या वन् प्राणी बिबट चा जीव वाचवता आला त्यासाठी ग्रामस्थांचे वनविभागाकडून आभार व्यक्त करण्यात आले. पशु वैद्यकीय अधिकारी कुडाळ श्री ठाकूर यांचे कडून रेस्क्यू करण्यात आलेल्या वन्यप्राणी बिबट्या ची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

सदर वन्यप्राणी बिबट्या च्या रेस्क्यु उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. नवकिशोर रेड्डी, सहायक वन संरक्षक (खा. कु.तो. व वन्यजीव) डॉ श्री.सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कडावल अमित कटके, वनपाल नेरूर अनिल राठोड, वनपाल मठ सावळा कांबळे, महेश पाटील, वनपाल गोठोस ,वनरक्षक अमोल पटेकर, बदाम राठोड, वनकर्मचारी यशवंत कदम, राहुल मयेकर यांनी सरपंच सरंबळ ,पोलीस पाटील दिलीप वालावलकर, व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केले.