रोटरी क्लब मालवण अध्यक्षपदी अभय कदम

सचिवपदी संदेश पवार, खजिनदारपदी बाळू तारी ; १६ जुलैला पद्ग्रहण सोहळा…

मालवण | प्रतिनिधी : रोटरी क्लब मालवण रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. २०२३-२४ या वर्षाच्या अध्यक्षपदी अभय कदम तर सचिवपदी संदेश पवार, खजिनदारपदी श्रीकृष्ण ऊर्फ बाळू तारी यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा प्रमुख अतिथी शरद पै व डॉ. राजन देशपांडे यांच्या उपस्थितीत १६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजीत करण्यात आला आहे.

जगात आशा निर्माण करणे हे यावर्षीचे बीद्रवाक्य असून वर्षभरात रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष अभय कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हॉटेल स्वामी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी संदेश पवार, विठ्ठल साळगावकर, ऋषी पेणकर, श्रीकृष्ण तारी, डॉ. लिना लिमये, डॉ. अजित लिमये, उमेश सांगोडकर, महादेव पाटकर, रंजन तांबे, संजय गावडे, रमाकांत वाक्कर आदि उपस्थित होते.

नूतन अध्यक्ष अभय कदम म्हणाले, यावर्षी शालेय व कॉलेज युवतीसाठी शारिरिक स्वच्छता व आरोग्य मोहिम, पोलिओ हटाव मोहिम, प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती बॉटल क्रशर बसविणे, कापडी पिशव्यांचा वापर, नशापान करून वाहन चालवू नये यासाठी तरूण पिढीमध्ये गांभीर्य निर्माण करणे, वयोवृद्धांसाठी संगणक प्रशिक्षण, शाळांमध्ये मुलामुलीसाठी वॉश इन स्कूल या कार्यक्रमाअंतर्गत स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच हात धुण्याची सोय, मच्छीमारांना प्राथमिक उपचार प्रशिक्षण, कॅन्सरविषयक जनजागृती तसेच कॅन्सर निदान शिबिर, गरजु मुलांसाठी क्लॉथ व टॉय बँक, वृक्षारोपण व रक्तदान शिबिर, रोजगार मेळावा, स्तनपान जागृती, हॅपी स्कूल प्रोजेक्ट, कचऱ्याचे निमुर्लन, पादचारी सुरक्षा जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

रोटरी क्लब नूतन कार्यकारिणी

व्हाईस प्रेसिडेंट – विठ्ठल साळगावकर, जॉईट सेक्रेटरी – ऋषीकेश पेणकर, इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट- रतन पांगे, क्लब सर्व्हिस- डॉ. लिना लिमये, कम्युनिटी सर्व्हिस- उमेश सांगोडकर, व्होकेशनल – सर्व्हिस महादेव पाटकर, इंटरनॅशनल सर्व्हिस- प्रदिप जोशी, युथ सर्व्हिस- तनिष्का कासवकर, रोटरी फाऊंडेशन- अजित लिमये, मेंबरशिप डेव्हलपमेंट- अनिल देसाई, क्लब अॅडमिन- प्रसन्नकुमार मयेकर, क्लब बुलेटिन – सुविधा तिनईकर, सार्जंट अॅट आर्मस- रंजन तांबे, स्पोर्टस चेअरमन- पंकज पेडणेकर, क्लब ट्रेनर – सुहास ओरसकर, लिटरसी प्रमोशन/ उज्जवला सामंत, डायरेक्टर पोलिओ प्लस – डॉ. अज्युत सोमवंशी, क्लब फेलोशिप – अमरजीत वनकुद्रे यांची निवड करण्यात आल्याची माहिती श्री. कदम यांनी दिली.