भाजपा बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांना विश्वास
डॉ. अर्चना सावंत यांना वाढता पाठींबा
सावंतवाडी । प्रतिनिधी :
भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार डॉ.अर्चना सावंत या उच्चशिक्षित असून शांत व संयमी आहेत. त्या नेहमीच लोकांचा आदर करतात व जनहिताची त्यांना तळमळ असल्याने अशा जनसेवक असलेल्या आपल्या हक्काच्या व्यक्तीलाच मत देऊन माजगांव ग्रामस्थ गावच्या विकासासाठी आपले योगदान देतील, असा विश्वास भाजपा बाळासाहेबांची सेना युतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपा युतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला ग्रामस्थांची व मतदारांची मिळत असलेली वाढती साथ पाहता असता त्यांनी युतीचा विजय निश्चित असल्याचा दावा केला. माजगाव मधील मतदार सुशिक्षित व जाणकार असून ते विकासाच्या मुद्द्यावर आम्हालाच साथ देतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रंगत आली आहे. माजगांवात या भाजप व बाळासाहेबांचे शिवसेना एकत्र लढत आहेत. या ठिकाणी सरपंच पदाच्या उमेदवार डाॅ. अर्चना रामचंद्र सावंत यांना मतदारांचा वाढता पाठींबा मिळत आहे. घरोघरी प्रचारासोबतच प्रत्यक्ष गाठीभेटींवर कार्यकर्त्यांनी भर दिला आहे. डॉ. अर्चना सावंत यांच्याकडे सरपंच पदाच्या सुशिक्षित महिला उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे यावेळी माजगावमध्ये परिवर्तन अटळ आहे असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
Sindhudurg












