राज्यात मिळविला सहावा क्रमांक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला प्रथम
संतोष राऊळ (कणकवली) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ग्रामीण विभाग कणकवली च्या सेंट ऊर्सुला स्कूल वरवडे ता. कणकवली च्या कुमार अनोण्या अनिल तांबे या विद्यार्थ्याने 93.2886 गुण मिळवून राज्यात सहावा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.12 फेब्रुवारी 2023 मध्ये ही परीक्षा झाली होती.राज्यात बाजी मारून अनोण्या अनिल तांबे यांनी आपली बुध्दिमत्ता सिद्ध केली आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र अभनंदन केले जात आहे.