ब्राह्मण सहाय्यक संघाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
चिपळूण (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे ब्राह्मण सहाय्यक संघाचा ब्राह्मण ज्ञातीच्या दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा रविवार ०९ जूलै रोजी ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळ्याला एस.पी.एम. इंग्रजी प्रशाला, परशुरामच्या मुख्याध्यापिका सौ.आरती खाडीलकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे होते. गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याची सुरवात ईशस्तवनाने झाली.
गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ.आरती खाडीलकर यांनी सर्वप्रथम मेहनत, चिकाटी याच्या जोरावर विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या सुयशाबद्दल कौतुक केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाबरोबरच शिष्यवृत्ती, ऑलिंपियाड सारख्या विविध स्पर्धा परिक्षा देऊन आपली किती तयारी झाली आहे? ते तपासले पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी नियमित व्यायामाला देखील प्राधान्य दिले पाहिजे, तसेच शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी मुलाखत देताना, या सर्वांची गरज असते हे सांगितले.
ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणामुळे अापले भविष्य घडत असते तसेच आयुष्यात नेहमी आपले आचरण व चारित्र्य निष्कलंक असले पाहिजे असे सांगितले.
गुणगौरव सोहळ्यात दहावीतील न्यु.इं.स्कूल सती मधील पार्थ प्रसाद जोशी, शंतनु महेश पटवर्धन, चैत्रा मकरंद मोडक, अनिकेत लालबाबू झा, ओम् गौतम शर्माधिकारी, युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण मधील आर्या कल्पेश जुवेकर, निखिल श्रीपाद पाटणकर, मुक्ता माधव गोखले, स्वानंद नितीन कार्लेकर, तेजस संतोष पटवर्धन, निषाद सुशांत नाईक, न्यू इंग्लिश स्कूल, पोफळी मधील आकाश अभय गरवारे, गद्रे इंग्लिश मिडियम स्कूल, चिपळूण मधील हर्ष श्रीकांत कुलकर्णी, निकिता भुषण साठे, अनुष्का शेखर फाटक, एस्. पी. एम्. परशुराम मधील आश्लेषा अजय देवधर, शारदा श्रीराम दांडेकर, इंद्रजित गिरीश जोशी, चिन्मयी प्रसाद पटवर्धन, कृष्णा अभिजित कुलकर्णी, मेरी माता हायस्कूल, खेर्डी मधील आर्यन मंदार वैद्य, वनश्री वैभव गानू, साक्षी अभिजित बापट, शर्वरी सुयोग बेडेकर, बारावीतील डि.बी.जे. महाविद्यालय चिपळूण मधील शास्त्र शाखेतील आर्या संतोष कुलकर्णी, निधी मिलिंद देवधर, योगिनी मिलिंद सहस्रबुद्धे, वाणिज्य शाखेतील अथर्व विनायक आचार्य, मृदुला मकरंद जोग, मधुरा मिलिंद शेंबेकर, कला शाखेतील तन्वी मनोज जोगळेकर, आर्या दिपक देवधर, मीरा महेश शहाणे, गद्रे इंग्लिश मिडियम स्कूल, चिपळूण मधील शास्त्र शाखेतील प्रद्युम्न पराग निमकर, वेदांग प्रसन्न जोशी, गौरांग विश्वजित मराठे, वाणिज्य शाखेतील अथर्व अजय पेंडसे, वेदश्री प्रसाद जोशी, वेदांत सुनिल चितळे, तसेच डि.बी.जे. महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील पदवीधर पार्थ धीरज काटदरे, अनुश्री अरविंद केतकर, रसिका राजेश फणसे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, पुस्तक व गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले. दहावीत संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळविणाऱ्या आर्या जुवेकर व बारावीत मराठी विषयात कोकण बोर्डात दुसरी व महाराष्ट्र राज्यात तिसरी आलेल्या योगिनी मिलिंद सहस्रबुद्धे या दोघींचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाला ब्राह्मण सहाय्यक संघ पदाधिकारी विश्वस्त रमेश आगवेकर, विवेक जोशी व सौ.शीलाताई केतकर, कार्याध्यक्ष अविनाश पोंक्षे, उपकार्याध्यक्ष डॉ.जयंत मेहेंदळे, कार्यवाह मधुसुदन केतकर, सहकार्यवाह मिलिंद पिंपुटकर, खजिनदार महेश देवधर, सदस्य विलास चौघुले, रमेश चितळे, श्रीकांत कुलकर्णी तसेच डॉ.मधुकर जोशी, उद्योजक प्रसाद पटवर्धन, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे संचालक नित्यानंद भागवत, डि.बी.जे.चे प्राध्यापक विनायक बांद्रे, महेश दीक्षित, विश्वास देवधर हे मान्यवर उपस्थित होते. या गुणगौरव सोहळ्याचे सुत्रसंचालन सौ. वैशाली चितळे व आभारप्रदर्शन – डॉ. जयंत मेहेंदळे यांनी केले.