पत्रकार अनंत जाधव आणि सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान यांना पत्रकार प्रेरणा पुरस्कार

Google search engine
Google search engine

ऑल जर्नलिस्ट फ्रेंड सर्कलने केली पुरस्कारांची घोषणा

सावंतवाडी । प्रतिनिधी :

भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या ऑल जर्नलिस्ट फ्रेंड सर्कलच्या पत्रकार प्रेरणा पुरस्काराची घोषणा शुक्रवारी करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातून बारा पत्रकार व छायाचित्रकार यांची घोषणा करण्यात आली असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लोकमतचे उपसंपादक अनंत जाधव यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच रक्तदान क्षेत्रात लक्षणीय कार्य करणाऱ्या सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानलाही प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कोल्हापूर येथील पत्रकार अधिवेशन कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांच्या उपस्थितीत २७ डिसेंबर रोजी वितरित केला जाणार आहे.

भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना म्हणून ऑल जर्नलिस्ट फ्रेड सर्कल गेले अनेक वर्षे काम करत असून पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत ते आवाज उठवत असतात महाराष्ट्रातील अनेक पत्रकाराच्या समस्या मंत्रालयीन पातळीवर सोडवल्या असून या संघटनेचे दरवर्षी अधिवेशन होते.त्यात पत्रकार आपल्या समस्या मांडत असतात. यावर्षी चे अधिवेशन २७ डिसेंबर ला कोल्हापूर येथे होत आहे. या अधिवेशनात ऑल जर्नलिस्ट फ्रेड सर्कलच्या पत्रकार प्रेरणा पुरस्कार प्राप्त पत्रकारा बरोबर राज्यातील दोन सामाजिक संस्थाना गौरविण्यात येणार आहे यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा समावेश आहे.तसेच पत्रकार प्रेरणा पुरस्कार प्राप्त लोकमत चे उपसंपादक अनंत जाधव यांना ही गौरविण्यात येणार आहे.

पत्रकार अनंत जाधव हे गेली वीस वर्षे विविध दैनिकातून आपली पत्रकारिता करीत असून मागील पंधरा वर्षे ते लोकमत मध्ये काम करत असून त्यांनी विविध विषयांवर लेखन केले आहे. तर सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात रक्तदान, देहदान चळवळ समाजामध्ये उभारून कार्यरत आहे. रक्तदान क्षेत्रात लक्षणीय कार्य संस्था करत आहे. त्यांच्या या जीवनदान चळवळीची दखल घेतली आहे.

पत्रकार अनंत जाधव व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान यांना कोल्हापूर येथील अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, माहिती उपसंचालक संभाजी खराट, ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कल चे संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल तसेच केंद्रिय अध्यक्ष गणेश कोळी,कांचन जाबोटी,राजेश पाटील आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Sindhudurg