उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठात ८ वे स्थान, महाराष्ट्रामध्ये २५ वे तसेच राष्ट्रीय पातळीवर १८१ वे स्थान
रत्नागिरी | प्रतिनिधी : इंडिया टुडे यांच्यामार्फत“ इंडिया टुडे उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय २०२३” रॅकिंग सर्वे घेण्यात आला. या सर्वेक्षणातून जाहीर करण्यात आलेल्या उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयाने संपूर्ण भारतामध्ये १८१ वे स्थान पटकावले आहे. तसेच ह्या महाविद्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये २५ वे स्थान, मुंबई विद्यापीठात ८ वे स्थान पटकावले आहे.
इंडिया टुडे गेले २६ वर्ष देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण करते. या सर्वेक्षणाच्या आधारावर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा ठरवला जातो. या सर्वेक्षणात मुख्यःत्वे महाविद्यालयाची मुलभूत माहिती, पायाभूत सुविधा, प्रशिक्षित शिक्षकवर्ग, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन, नोकरीतील संधी, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकास घडवण्यासाठी महाविद्यालयाकडून प्रयत्न आणि विद्यार्थ्यांना प्रदान केलेले शैक्षणिक वातावरण आणि शिक्षणातील स्त्रोत या गोष्टीचा विचार करण्यात आला.
फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड टेक्नॉलॉजी हे महाविद्यालय १९९६ साली फिनोलेक्स समूहाचे अध्यक्ष कै. श्री. पी. पी. छाब्रिया यांच्या प्रेरणेतून उभे राहिले. कोकणातील विद्यार्थ्यांना उच्य प्रतीच्या अभियांत्रिकी शिक्षणाबरोबर व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकासाचे योग्य प्रशिक्षण प्रदान करून, नामांकित आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर ॲकॅडमीचा नेहमीच कल राहिला आहे.
नुकतेच या अभियांत्रिकी महाविद्यालयाने “आऊटलुक-आय केअर प्रोफेशनल कॉलेज सर्व्हे २०२३” च्या सर्वेक्षणात भारतातील १६० उत्कृष्ट खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत ६३ वे स्थान, महाराष्ट्रामधील उत्कृष्ट खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत ६ वे स्थान पटकावले आहे. तसेच या सर्वेक्षणात भारतातील १६० उत्कृष्ट खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत स्थान मिळवणारे हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठ व कोकणातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. “टाईम्स इंजिनिअरिंग रॅकिंग २०२३” सर्वेक्षणात संपूर्ण भारतामधील १७० उत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर १२९ वे स्थान, महाराष्ट्रामध्ये २७ वे व मुंबई विद्यापीठात १४ वे स्थान पटकावले आहे. तसेच “द वीक – हंसा रिसर्च बेस्ट कॉलेज सर्वे २०२३” या सर्वेक्षणात मुंबई विद्यापीठामध्ये ६वे स्थान, महाराष्ट्रातील उत्कृष्ट खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत २०वे स्थान, खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत भारताच्या पश्चिम विभागात राष्ट्रीय पातळीवर २७वे स्थान, उत्कृष्ट खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर १८४वे स्थान, उत्कृष्ट सरकारी व खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर २१३वे स्थान पटकावले आहे.
या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचारीवर्ग यांचे अभिनंदन केले