वैभवशाली पतसंस्थेच्या चेअरमनपदी मंदार सांबारी बिनविरोध

 

आचरा | अर्जुन बापर्डेकर : वैभवशाली श्रीदेव रामेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित आचरा या संस्थेच्या चेअरमनपदी .मंदार श्रीकांत सांबारी यांची बिनविरोध निवड झाली.
या पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्रीकांत सांबारी यांच्या निधनाने चेअरमन पद रिक्त झाले होते. गुरूवारी झालेल्या चेअरमन निवडीत सर्व संचालकांनी मंदार सांबारी यांची एकमताने चेअरमन पदी निवड केली. यावेळीसंचालक सुरेश राजाराम हडकर, राजन दयाळ पांगे , लक्ष्मण भिवा आचरेकर. वामन गंगाराम आचरेकर,दिलीप शांताराम कावले. मनोज महादेव वाडेकर, मंदार श्रीकांत सांबारी,डॉ प्रमोद विष्णू कोळंबकर. संतोष लक्ष्मण गावकर,पांडुरंग धोंडू वायंगणकर,प्रकाश दिनकर मेस्त्री, सौ. रागिनी राजेंद्र ढेकणे सौ. हेमांगी प्रकाश खोत यांसह सर्व कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले. मंदार सांबारी यांच्या चेअरमन पदी निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.