आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात
मुंबई : “मी अजित पवारांना समर्थन दिलं आहे. मात्र, याचा अर्थ मी भाजपचा प्रचारक असेल किंवा भाजप सत्तेवर जाण्यासाठी मी प्रयत्न करेल असा नाही”, असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं होतं. अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी सडकून टीका केली आहे. यामुळे आता भाजप आणि अजित पवार गटात मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार गट सत्तेत आल्याने भाजप आणि शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. अशात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्यावर वक्तव्यावर प्रतिक्रिया देत निलेश राणे म्हणाले, “आत्ताच कुठेतरी वाचलं मिटकरी म्हणतो मी भाजपचा प्रचार करणार नाही… हा कोण आहे?? आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात. भलताच कॉन्फिडन्स असतो काही लोकांना.