आ. नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश
तालुका सरचिटणीस नारायण कांबळी यांची माहिती
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावात भेडसावणारी मोबाईल रेंज व इंटरनेटची समस्या आता दूर होणार आहे. भाजपचे युवा नेते आ. नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून तळवणे गावात जिओ कंपनीचा टॉवर उभारण्यात येणार आहे. मार्च महिन्यात हे काम सुरु होणार असून यामुळे गेली अनेक वर्षे होत असलेली समस्या दूर होणार असल्याची माहिती भाजपचे तालुका सरचिटणीस नारायण कांबळी यांनी दिली.
तळवणे गावात गेली अनेक वर्षे मोबाईल रेंज व इंटरनेटची समस्या भेडसावत होती. यामूळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच इतर ग्रामस्थांनाही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर ही समस्या दूर व्हावी यासाठी भाजपचे तालुका सरचिटणीस नारायण कांबळे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे जिओ टॉवर साठी मागणी केली होती.
अखेर त्यांच्या या मागणीला यश आले असून आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यानंतर तळवणे गावात जिओ कंपनीचा टॉवर उभारला जाणार आहे. त्याचा फायदा तळवणे गावासह पंचक्रोशीतील अन्य गावांना ही होणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ही समस्या दूर होत असल्याने नारायण कांबळी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

Sindhudurg