अन्यायग्रस्त अनुसूचित जमातींवरील होणारा अन्यायविरूद्ध ऑफ्रोहचे नारे निदर्शने आंदोलन

रत्नागिरी (प्रतिनिधी): संविधान कायदा 108- 1976 क्षेत्रबंधन उठवल्याने आदिवासी जमातींना संविधानिक हक्क मिळावे व अन्यायग्रस्त अनुसूचित जमातींवरील होणारा अन्याय दूर करणेसाठी
ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन व महिला आघाडी शाखा रत्नागिरीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत नारे निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी ऑफ्रोहच्या वतीने अन्यायग्रस्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांना देण्यात आले. निवेदन देण्यासाठीच्या शिष्टमंडळात ऑफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर,उपाध्यक्ष नंदा राणे, सचिव बापुराव रोडे,कोषाध्यक्ष किशोर रोडे ,हरीभाऊ ताडे यांचा समावेश होता.
अनुसूचित क्षेत्रातील (TSP) अनु. जमातीप्रमाणेच OTSP तील आदिवासींना जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावेत,TSP आदिवासींच्या सर्व योजना OTSP तील आदिवासींना लागू करा, जर न्याय मिळत नसेल तर विस्तारीत क्षेत्रातील ३३ अनु. जमातींच्या लोकसंख्येच्या आधारावर निवडून आलेल्या १४ बोगस आदीवासी आमदार व २ बोगस आदिवासी खासदार यांना हटवा, माजी न्यायमुर्ती गायकवाड समितीच्या अहवालानुसार आदिवासी विकास विभागात ६५०० कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात टाका, आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष मा. सुरेश धस यांचा आदिवासी विकास विभागात दाबून ठेवलेला अहवाल तात्काळ उघड करा. अनु. जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समितीने “प्रधान” यांना ‘परधान’ जमातीचे, “आंध” यांना ‘अंध’ जमातीचे, “बुरुड” यांना ‘गोंड जमातीचे दिलेले बोगस वैधता प्रमाणपत्र रद्द करा व या तपासणी समितीची व अधिकाऱ्यांची कसून चौकशी करा, या मागण्यांचा समावेशही निवेदनात करण्यात आला आहे.
या नारे निदर्शने आंदोलनात ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, उपाध्यक्ष नंदा राणे, सचिव बापूराव रोडे, कोषाध्यक्ष किशोर रोडे, माजी उपाध्यक्ष सिंधुताई राजेश सनगाळे व महिला आघाडीच्या सचिव सुनंदा देशमुख, सहसचिव स्वाती रोडे, सदस्य प्रतिभा रोडे, सुरेखा घावट तसेच रत्नागिरी ऑफ्रॉहचे पंडित सोनवणे, विलास देशमुख, हरिभाऊ ताडे, सतिश घावट, विलास घावट, बंडू चेचरे, राजेश कुंभारे, श्रीकृष्ण भांडे, राजेश सनगाळे, अशोक दांडगे, शुभम घावट इत्यादी उपस्थित होते.