रोटरी क्लब ऑफ वैभववाडी अध्यक्ष पदी संजय रावराणे यांची निवड

 

गव्हर्नर चिफ असिस्टंट रो. अशोक नाईक यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी | प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. नुतन अध्यक्ष पदी रो.श्री संजय  शिवाजी रावराणे यांनी पदभार  स्वीकारला.
पदग्रहण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून गव्हर्णर चिफ असिस्टंट रो. अशोक नाईक उपस्थित होते. इरिया हेड रो. प्रणय तेली, असिसस्टंट गव्हर्णर रो. राजन बोभाटे, रो.संजय पुनाळेकर, रो. गावडे,  रो.डॉ.विध्याधर तायशेटे,  रो.दिपक बेलवलकर, रो.निता गोवेकर, रो.प्रविण पोकळे, रो.ॲड अंधारी, रो.बांदेकर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.  या वेळी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे अध्यक्ष म्हणून रो.संजय रावराणे, सेक्रेटरी रो. प्रशांत गुळेकर, खजिनदार म्हणून रो. तेजस अंबेकर व अन्य सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते पदभार देण्यात आला.
मावळते अध्यक्ष रो. संतोष टक्के यांनी वैभववाडी तालुक्यात रोटरी क्लब स्थापन करणेसाठी डॉ. विध्याधर तायशेटे व कणकवली क्लब यांनी केलेल्या सहकार्याबध्दल आभार मानून कणकवली व कुडाळ क्लबच्या सहकार्याने आपण रोटरी जाणून घेतली. आणि रोटरीला अभिप्रेत काम करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. गेल्या वर्षभरात जे प्रकल्प राबविले त्या साठी वैभववाडी क्लबच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले म्हणूनच डिस्ट्रीक गव्हर्णर रो. व्यंकटेश देशपांडे यांनी त्यांची दखल घेतल्याचे सांगितले. माजी सेक्रेटरी व नुतन अध्यक्ष रो. संजय रावराणे यांनी गेल्या वर्षभरात राबविलेल्या प्रकल्पाचा आढावा घेऊन आपण येत्या वर्षभरात वैभववाडी तालुक्यातील शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील प्रकल्प राबविणार असल्याचे सांगीतले.

    प्रमुख पाहूणे गव्हर्णर चिफ असिस्टंट रो. अशोक नाईक यांनी  रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे गेल्या वर्षभरातील काम व आजचा देखणा कार्यक्रम पाहून या क्लबला दहा ते पंधरा वर्ष झाल्या सारखे वाटत असल्याचे  सांगितले. मी गेले वर्षभर या क्लबचे सर्व कार्यक्रम पहात आहे. रो. संतोष टक्के व सहका-यांनी  पहिल्या वर्षातच रोटरी समजून घेत गौरवास्पद काम केल्याचे  सांगितले. त्यांनी जवळपास 100 पेक्षा जास्त प्रकल्प गेल्या दिड वर्षात राबविले आहेत. एस टी स्टँड सुशोभिकरण, मॅरेथॉन, एम.एच.एम या महत्वपुर्ण उपक्रमांची दखल गव्हर्णर यांनी घेतल्याचे सांगितले. इरिया हेड रो. प्रणय तेली यांनीही वैभववाडी रोटीरी क्लबच्या कार्याचे कौतूक केले. असि. गव्हर्णर रो.राजन बोभाटे, जीएसआर रो.डॉ. विध्याधर तायशेटे यांनी आपल्या मनोगतात वैभववाडी क्लबचे कौतुक करुन आपण या पुढेही या क्लबला सहकार्य करु असे सांगितले.

     या वेळी वैभववाडी तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनीचे वैभववाडी उपविभागातील प्रधान तंत्रज्ञ श्री गणेश अनंत पाटेकर यांच्या उल्लेखनिय कार्याचा गौरव करुन सप्तनीक सत्कार करण्यात आला. तसेच वैभवावडीतील सौ सुवर्णा सुधाकर रावराणे यांचा सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.  रोटरी क्लब ऑफ वैभववाडीला नव्याने दाखल झालेल्या श्री.संतोष कोलते, श्री.विजयसिंह रावराणे, सौ नेहा रावराणे, सौ. संजना रावराणे, सौ स्नेहल खांबल या सदस्यांचे पीन लाऊन स्वागत करण्यात आले.  गेल्या वर्षभरात रोटरी क्लब ऑफ वैभवववाडीला विशेष सहकार्य केल्या बध्दल रो. सौ सलोनी टक्के यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी शालेय्य विध्यार्थ्यांना स्कुल बँग, शैक्षणिक साहित्य व छत्री, माध्यमिक विध्यालयांना कुलर प्रदान करण्यात आले. ट्रेझरर रो. प्रशांत गुळेकर यांनी आभार मानले.