सावंतवाडी तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीसाठी ६७७ कर्मचारी रवाना

Google search engine
Google search engine

एकूण १५५ मतदान केंद्रावर होणार निवडणूक

पोलीस अधिकारी व कर्मचारीही सज्ज

तालुक्यातील तीन ग्रामपंचायती, ७ सरपंच व ११२ सदस्य बिनविरोध

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील ५२ पैकी ३ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यात गेळे, नेतर्डे व कुडतरकरटेंब या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर एकूण ७ सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरीत तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या व ४५ सरपंचपदासाठीची निवडणूक रविवार १८ डिसेंबरला होत आहे. यासाठी मतदान अधिकाऱ्यांसह ६७७ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले तैनात असून शनिवार १७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून साहित्य वितरण करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अरुण उंडे यांनी दिली. यावेळी निवासी नायब तहसीलदार मनोज मुसळे यांसह मंडल अधिकारी, तलाठी, निवडणूक निर्णय अधिकारी, ग्रामसेवक व इतर खात्यांचे कर्मचारी, शिक्षक आदी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुक्यात एकूण ५२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यातील ३ ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तर एकूण ७ सरपंच व ११२ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे सदस्य पदासाठी आता प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या जागांची संख्या ३०६ अशी असून त्यासाठी एकूण ६४९ उमेदवार रिंगणात आहेत. तर ४५ सरपंच पदांसाठी एकूण १२५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

यासाठी १५५ मतदान केंद्रावर निवडणूक होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी कंट्रोल युनिट आणि १५५ पेक्षा जास्त बॅलेट युनिट व अन्य साहित्य निवडणूक कर्मचाऱ्यांसमवेत रवाना झाले आहे. त्यासाठी बारा टेबल वरून साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. ज्या पद्धतीने मतदान प्रक्रियेसाठी साहित्य वाटप करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने मतदान प्रक्रिया झाल्यानंतर सायंकाळी त्याच १२ टेबलवर मतदान झालेल्या मशीन व साहित्य पुन्हा ताब्यात घेण्यात येणार आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान १ केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक पोलीस व एक शिपाई असे कर्मचारी तैनात असणार आहेत. याशिवाय ५ राखाव अधिकारीही तैनात आहेत.

Sindhudurg