सावंतवाडी बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रवादीचा ‘ हल्ला बोल ‘

सौ. अर्चना घारे – परब यांच्या नेतृत्वात छेडले आंदोलन

परिस्थिती सुधारण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीनं कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या नेतृत्वाखाली ‘हल्लाबोल आंदोलन ‘ छेडण्यात आले. बस स्थानकाची झालेली दुरावस्था तसेच सुधारणा करण्याबाबत अधिकाऱ्यांमध्ये असणारी अनास्था व त्यांचा एकूणच ढिसाळ कारभार याचा निषेध करत सौ. घारे परब यांनी अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांचे अल्टिमेटम दिले. येत्या १५ दिवसांमध्ये जर बस स्थानकाची परिस्थिती सुधारली नाही तर बस स्थानकामध्ये चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला.
संपूर्ण बसस्थानकाची दिवसभरात किमान २ वेळा स्वच्छ्ता व्हायला हवी, आसन व्यवस्था दुरुस्त करण्यात यावी, रात्रीच्या वेळी बसस्थानकात पुरेसा उजेड असण्यासाठी रोषणाई व्हावी, डेपो मधील शेड दुरुस्ती, डिझेल पंप शेड वॉटर प्रुफिंग, कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी त्वरित दूर करण्यात याव्यात, बसस्थानकात डांबरीकरण करण्यात यावे ज्यामुळे पाणी साचणार नाही, बसस्थानकात ऑन ड्युटी पोलिसांसाठी कक्ष,हिरकणी कक्ष यांची निर्मिती करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी सौ. अर्चना घारे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष ॲड. रेवती राणे, जिल्हा उपाध्यक्ष असिफ शेख, तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, चराटा ग्रामपंचायत सदस्य गौरी गावडे, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, तालुका उपाध्यक्ष समीर सातार्डेकर, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, रत्नागिरी महिला जिल्हा निरीक्षक दर्शना बाबर देसाई, उद्योग व्यापार जिल्हाध्यक्ष आशिष कदम, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, अल्पसंख्यांक तालुका महिला अध्यक्ष मारीता फर्नांडिस, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष जहूर खान, शहरचिटणीस राकेश नेवगी, उद्योग व्यापार तालुकाध्यक्ष नवल साटेलकर, तालुका उपाध्यक्ष उद्योग व्यापार याकूब शेख, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, वैभव परब, शेखर परब आदी उपस्थित होते.