कार्यकर्ते मेळाव्यात तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.
मंडणगड | प्रतिनिधी – कोकण दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 14 जुलै 2023 रोजी मंडणगड तालुक्यास भेट दिली. त्यांच्या दौऱ्याच्या निमीत्ताने भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात पदाधिकारी मेळावा व कार्यकर्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे औचीत्य साधून तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना पक्षाचे पदाधिकारी म्हणुन नियुक्ती झाल्याची नियुक्ती पत्रे श्री. ठाकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना श्री. राज ठाकरे म्हणाले की, पक्षाची संघटना बांधण्यासाठी मी कोकण दौऱ्यावर आलो आहे व काही नवीन नियुक्त्या केल्या आहेत व पक्षाचे काम अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात तालुक्यासात पक्ष वाढीकरिता स्वतंत्र कार्यक्रम हाती घेणार असल्याचे तसेच पक्षाचे युवक व महिला संघटन अधिक मजबुत करण्यासाठी नियोजनात्मक कार्यक्रम राबवुन आगामी दोन महिन्यात परत मंडणगडला भेट देवून येथील येथील कामाचा आढावा घेणार असल्याचे सांगीतले. कार्यकर्त्यांनी मतदारांशी थेट संपर्क साधुन मतदारसंघातून आपला स्वताःचा आमदार निवडुन आणावा असे कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले. कार्यक्रमास मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.