संतोष कुळे | चिपळूण : राजकीय क्षेत्रामध्ये नव्याने एन्ट्री घेतलेल्या बळीराज सेना पक्षाची घोडदौड संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार सुरू आहे. पक्षप्रमुख संस्थापक अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष वाटचाल करत आहे . याच बळीराजा सेनेची सभा गुहागर शृंगारतळी येथे रविवार रविवार दिनांक 16 रोजी सकाळी ११ वाजता गुहागर बाजारच्या ठिकाणी होणार आहे. यावेळी बळीराज सेना पक्षाची भूमिका स्पष्ट होणार आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती स्थापन झालेल्या बळीराज सेनेची वाटचाल अतिशय नियोजनबद्ध सुरू आहे. कोकण आणि विदर्भ मराठवाडा या ठिकाणी सुद्धा बळीराज सेनेला लोकांकडून चांगल्या प्रतिसाद मिळत आहे. राजकीय क्षेत्रात असणाऱ्या कुणबी, ओबीसी, आणि कष्टकरी बांधवांची राजकारणात गळचेपी होत आहे. सध्या महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या थराला गेले आहे याची जाणीव सर्वांना आहे. लोकशाहीची मूस्कटदाबी सुरू आहे. त्यामुळे अशा राजकारणापेक्षा निश्चितच नव्यानेच स्थापन झालेला बळीराज सेना पक्ष उत्तम असून भविष्यात या पक्षाचे राजकीय अस्तित्व उज्वल असल्याचे बोलले जात आहे.
याच बळीराज सेनेची गुहागर येथे रविवार 16 रोजी सभा होत असून या सभेला बहुजन समाजातील बरेच राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी पक्षाची भूमिका, ध्येयधोरण स्पष्ट होणार आहेत. पक्ष प्रमुख अशोक वालम स्वतः उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन बळीराज सेनेच्या वतीने करण्यात येत आहे.