सवलतीची मुदत 1 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार
रत्नागिरी : शहरातील प्रतितयश कुसूमताई सहकारी पतसंस्थेचा ठेव वृद्धीमास 1 जुलैपासून सुुरु झाला असून चौदा दिवसांमध्ये 2 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ग्राहकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. सवलतीची मुदत 1 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. याचा लाभ सभासदांसह नवीन ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष प्रा. दत्तात्रय उर्फ नाना शिंदे आणि उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी केले आहे.
कुसुमताई पतसंस्थेने अल्पावधीमध्ये रत्नागिरी तालुक्यासह शृंगारतळीतील ग्राहकांमध्ये नाव मिळवले आहे. ग्राहकांसाठी चांगल्या सुविधा पतसंस्थेकडून देण्यात आल्या आहेत. पतसंस्थेच्या एकुण सहा शाखा आहेत. 1 जुलै पासून पंतसंस्थेचा ठेववृध्दी मास सुरु होत आहे. पतसंस्थेने 1 वर्ष मुदतीकरीता 8 टक्के व्याज, 3 वर्ष मुदतीकरिता (पुर्नगुंतवणूक) 7 टक्के तर 3 वर्ष मुदतीकरिता मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक व्याज 7.5 टक्के ठेवण्यात आले आहे. ठेव वृध्दी मास सुरु झाल्यानंतर चौदा दिवसांमध्ये 2 कोटी रुपयांच्या ठेवी पतसंस्थेच्या रत्नागिरी शहरातील गाडीतळ येथील मुख्य कार्यालय, जाकादेवी बाजारपेठ, खंडाळा बाजारपेठ, खेडशी गयाळवाडी फाटा, पावस बाजारपेठ आणि शुंगारतळी बसस्टॅण्ड येथील शाखांमध्ये जमा झाल्या आहेत. पंतसंस्थेचे भागभांडवल 62 लाख रुपये जमा झाले आहेत. यावर्षी ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे एकुण ठेवी 34 कोटीवर गेल्या आहेत. तर कर्ज प्रकरणे 25 कोटीवर आहेत. दहा कोटीची पंतसंस्थेची गुंतवणुक आहे. पंतसंस्थेकडून दिल्या जाणार्या सोयीसुविधांमुळे ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याचे श्री. शेवडे यांनी सांगितले. पतसंस्थेने सहकार कायद्यतील सर्व तरतुदी पतसंस्थेने पुर्ण केल्या असून सर्व शाखा डिजिटल, क्यु आर कोड सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. सोनेतारण कर्जाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विज बिल भरण्याची सुविधा सर्वच शाखांमध्ये उपलब्ध आहे. ठेव वृध्दी मासाचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना पतसंस्थेच्या या शाखांना भेटी द्या असे आवाहन श्री. शेवडे यांनी केले आहे.