सावंतवाडीत लवकरच क्रिकेट प्रशिक्षण अकॅडमी होणार सुरू

नामवंत माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक करणार मार्गदर्शन

अकादमीचे व्यवस्थापक व प्रशिक्षक ऋषिकेश कारीवडेकर यांची माहिती

सावंतवाडी । प्रतिनिधी :

सावंतवाडीतील क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सावंतवाडी येथे लवकरच सुरु होत आहे. या अकादमीच्या मुख्य उद्दीष्टांमध्ये कमी वयाच्या मुलांमध्ये क्रिकेटचे सर्व बारकावे विकसीत करुन त्यांना पूर्ण परीपक्व क्रिकेटपटू बनवणे हेच असेल.

या अकादमीमध्ये प्रामुख्याने वय वर्ष ९ ते १२ वयाच्या मुले व मुलींना घडविण्याचा प्रयत्न राहील. अकादमीमध्ये क्रिकेट सराव व्यतिरीक्त मुला मुलींना शारीरीक तसेच मानसिक दृष्टया सक्षम बनविणे, क्रिकेटचे नियमांची माहिती देणे, पंचगिरी करणे तसेच क्रिकेटचे इतर बारकावे शिकवणे, कर्णधार बनण्यासाठीचे कौशल्य शिकवीले जाईल.

अकादमीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत प्रशिक्षक तसेच ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेटच्या संघासाठी सर्व वयोगटाच्या खेळाडूंना घडविले, तसेच उत्कृष्ट मार्गदर्शन करुन सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट संघासाठी ज्यांनी फार मोठे योगदान दिले आहेत असे दिनेश कुबडे सर्व वयोगटाच्या मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या सोबत फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजीओ, योगा प्रशिक्षक असणार आहेत. अकादमीसाठी महाराष्ट्र तसेच गोवा, मुंबई संघातील माजी रणजी खेळाडूंचे तसेच प्रशिक्षकांचेही मार्गदर्शन होणार आहे.

अकादमीच्या मुख्य उद्दीष्टांमध्ये अकादमीतील क्रिकेटपटूंना तालुकास्तर, जिल्हास्तर, राज्यस्तर तसेच देश पातळी पर्यंतच्या खेळविण्यासाठीचा प्रयत्न असणार आहे. यापूर्वीही दिनेश कुबडे सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंना महाराष्ट्राच्या संघात तसेच प्रिमीयर लिग स्पर्धा, तसेच गोवा येथील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. त्यांचे फार मोठे मार्गदर्शन अकादमीतील खेळाडूंना मिळणार आहे.

मुली किंवा महिलांच्या १५ व १९ वर्षाखालील तसेच खुला गटाच्या निमंत्रीतांच्या स्पर्धांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून प्रारंभ झालेला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुली किंवा महिलांच्या संघासाठी आपली प्रतिभा सिध्द करण्याची अप्रतीम संधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे सर्व वयोगटाच्या मुलींना या संधीचा फायदा घ्यावा.

जे खेळाडू सध्या स्पर्धात्मक क्रिकेट खेळत आहेत, ज्यांची कामगिरी उच्च दर्जाची होत नाही आहे, त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देखील अकादमीतर्फे दिनेश कुबडे सर व त्यांचे सहकारी करणार आहेत.

अकादमीतर्फे मंगळवार २० डिसेंबर पासून नाव नोंदणी सुरु होणार आहे. खेळाडूंना अकादमी तर्फे अकादमीची २ टीशर्ट, २ कॅप, १ जॅकेट देण्यात येणार आहे. दिनांक १ जानेवारी २०२३ पासून अकादमी सुरु होणार आहे. तरी इच्छुक खेळाडूंनी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी मुले आणि मुली यांनी अकदमीचे प्रशिक्षक व व्यवस्थापक ऋषिकेश कारीवडेकर ७३८७६००११६ / ९४२१५९०११६ यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करुन घ्यावी.

तसेच दिनांक ३० डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करणाऱ्या पहिल्या २५ मुले/मुली क्रिकेटपटूंना प्रशिक्षण फिमध्ये २०% सवलत दिली जाईल, अशी माहिती अकादमीचे व्यवस्थापक व प्रशिक्षक ऋषिकेश विश्राम कारीवडेकर यांनी दिली आहे.

Sindhudurg