सामाजिक बांधिलकी संघटनेचा स्तुत्य उपक्रम
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील सुवर्ण कॉलनी येथे प्रकाश कोटकर यांच्या घराशेजारी एक महिला वाट चुकून आल्याचे सकाळी निदर्शनास आले.
सुनंदा रामचंद्र तांबे (७०) असे आपले नाव असून आपण वाट चुकून आली आहे व आपले गाव मसुरा गावठणवाडी आहे. आपण तेथील रवळनाथ मंदिरच्या बाजूला राहते, अशी माहिती तिने दिली. त्यांनतर सामाजिक बांधिलकी संघटनेचे रवी जाधव यांनी सदर चुकलेल्या महिलेबाबत सकाळी सात वाजता माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज केला. त्यांतर या वाट चुकलेल्या वृद्ध महिलेच्या नातेवाईकांचा शोध अवघ्या पंधरा मिनिटात लागला व सदर महिलेला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यासाठी प्रकाश कोटकर व सावंतवाडी पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले. यासाठी संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी रवी जाधव व सामाजिक बांधिलकी संघटनेचे आभार मानले.