वेंगुर्ले : प्रतिनिधी l जि.प.शाळा वेंगुर्ले नं ४ या शाळेतील २ विद्यार्थी शहरी राज्य स्तरावरील यादीत शिष्यवृत्ती धारक ठरले. यामध्ये वेद अभिषेक वेंगुर्लेकर आणि हंसिका जगन्नाथ वजराटकर यांचा समावेश आहे. त्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी वेंगुर्ले नं ४ शाळेतील मार्गदर्शन शिक्षिका श्रीम. लिना नाईक, मुख्याध्यापक श्रीम. संध्या बेहरे, शिक्षक वृंद, पालक व शाळा व्यवस्थापन समिती या सर्वाचे अभिनंदन होत आहे.