ओटवणे (प्रतिनीधी) सावंतवाडी स्थानकातून सकाळी 8.30 वाजता सुटलेली ओटवणे एस. टी. ओटवणे मेट येथिल अवघड वळणावर अचानक रीवर्स गेअर लॉक झाल्यामुळे बंद पडली वाहन चालकाने प्रसंगावधान राखत एस टी थांबवली न पेक्षा 30, 40फूट खोल दरीत घाटीत कोसळून मोठा अनर्थ घडला असता . यात एस टी चे मोठे नुकसान झाले नसले तरी मोठा अनर्थ टळला जर ही घटना ओटवणेहून येताना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. एस टी ओटवणेत न आल्याने आणि आज शनिवार असल्याने 9 वाजता च्या एस. टी. ने जाणाऱ्या कॉलेज युवकांची तारांबळ उडाली. तसेच ग्रामस्थांची मोठी गैरसोय मात्र झाली .