राजापूर महसूल कार्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी राजाराम शिंदे यांची फेरनिवड

राजापूर (वार्ताहर): रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या राजापूर तालुका कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राजापूर तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी राजाराम शिंदे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
सन २०२३ – २०२४ करीता नव्याने कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून यामध्ये अध्यक्षपदी राजाराम शिंदे (गोदाम व्यवस्थापक), कार्याध्यक्षपदी शंकर घडशी (अव्वल कारकून), उपाध्यक्षपदी- बाजीराव पाटील मंडळ अधिकारी राजापूर, महिला उपाध्यक्षपदी दिपा निटुरे (महसूल अव्वल कारकून) सरचिटणीसपदी विकास पिठलेकर (सं.गा.यो अव्वल कारकून), खजिनदारपदी मकरंद प्रभूलकर (महसूल सहाय्यक), संघटक सचिवपदी दिपक गवंडी (वाहनचालक), चिटणीसपदी दादासाहेब थोरात (मंडल अधिकारी कोंड्ये तर्फे सौंदळ) प्रसिद्धी प्रमुख म्हणून मंगेश पाटणकर (महसूल सहाय्यक), महिला प्रतिनिधी म्हणून प्रांजली जोशी ( महसूल अव्वल कारकून) तर चतुर्थश्रेणी कर्मचारी प्रतिनिधी म्हणून अनंत मोरे यांची निवड करण्यात आली.
शिंदे हे सन २०१६ पासून महसूल संघटनेत पदाधिकारी म्हणून कार्यरत असून, महसूल कर्मचारी यांचे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले विविध प्रश्न सोडविल्यामुळे शिंदे यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष सुनील कीर तसेच राजापूर तालुक्यातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
या बैठकीला जिल्हा प्रतिनिधी मंगेश परांजपे तसेच राजापूर उपविभागीय अध्यक्ष अमित मोरे उपास्थित होते.