आंजर्ले समुद्रकिनारी सापडला दुर्मिळ पक्षी

 

दापोली | प्रतिनिधी : परिमंडळ वन अधिकारी दापोली यांना श्री. मनोज केळकर रा आंबवली बुद्रुक ता दापोली यांनी भ्रमणध्वनीवरून दिलेल्या माहितीच्या अनुषगांने मौजे आंबवली बुद्रुक, ता दापोली येथे दि.१०.०७.२०२३ रोजी सकाळी लाल चोचीचा उष्ण कटीबंधीय (Red Billed Tropic Bird) हा दुर्मिळ पक्षी श्री. मनोज केळकर रा आंबवली बुद्रुक ता दापोली यांना दिसून आला. सदर पक्षी भरकटलेल्या अवस्थेत खाडीकीनारी जवळ असलेल्या आंबवली बुद्रुक या गावात आढळुन आलेने श्री केळकर यांनी वनविभागास कळविले.

सदर माहितीचे अनुषंगाने श्रीम. शुभांगी. दा. गुरव वनरक्षक कोंगळे व श्री प्रतिक बाईत, व मनित बाईत सर्पमित्र आजलें यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून सदर लाल चोचीचा उष्णकटीबंधीय पक्षी (Red Billed Tropic Bird) ताब्यात घेवून सदरचा पक्षी वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत सुस्थितीत असल्याची खात्री करुन त्यास मौजे आंजर्ले सुमुद्रकिनारी नैसर्गिक अधिवासात सोडुन मुक्त करणेत आले.

लाल चोचीचा उष्ण कटिबंधीय पक्षी (Red Billed Tropic Bird) हा दुर्मिळ पक्षी असून हा उष्ण कटिबंधीय पक्षी कुटूंबातील आहे. सदर पक्षाच्या तीन प्रमुख उपप्रजाती आहेत. त्यापैकी भारताच्या समुद्रकिनारी Phaethona ethereus ही उपप्रजाती भारताच्या समुद्रकिनारी आढळून येते. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झरवेशन ऑफ नेचर (IUCN ) यांनी या पक्षांच्या प्रजातींचे वर्गीकरण किमान चिंताजनक म्हणून सुचिबध्द केले आहे. हे पांढ-या रंगाचे उष्ण कटीबंधीय पक्षी तीन उष्णकटीबंधीय पक्षी प्रजातींपैकी सर्वात मोठे आहेत. आणि त्यांची लांबी ९० ते १०० सेंमी आहे. ज्यात ५० सेमी लांब शेपटीचा समावेश आहे. पंखांचा विस्तार सुमारे १०० सेमी आहे. प्रौढ पक्षाचे वजन सुमारे सुमारे ७५० ग्रॅम असते. या पक्षांना कडक किंचीत वक्र लाल रंगाची चोच असते. त्यांचे शरीरावरील पंख हे पांढरे असून टोकाला काळया रंगाचे असतात. दोन डोळयामधुन एक काळी पटटी जाते. नर पक्षामध्ये लांब शेपटी वगळता नर आणि मादी समान दिसतात. हे किरमीजी रंगाचे उष्णकटीबंधीय पक्षी हे दुर्गम बेटांवर प्रजनन करणारे समुद्री पक्षी आहेत. ते मासे, उडणारे मासे, क्रस्टेशियन्स आणि पाण्याच्या पृष्ठभागावरुन किंवा पाण्यात डुबकी मारुन काढलेले इतर समुद्री जीव खातात. हे उष्णकटिबंधीय पक्षी विरळ वसाहतींमध्ये प्रजनन करतात. घरटयात सामान्यत एकच अंडे असते आणि अंडी उबवण्याचे काम प्रामुख्याने मादी पक्षी करते.

लाल चोचीचा उष्णकटिबंधीय पक्षी हा पक्षी १९६२ आणि १९७२ साली मुंबईच्या किना-यावर मृतावस्थेत सापडलेच्या नोंदी आहेत. हा पक्षी खोल समुद्रात अधिवास करत असून तो सातत्याने उडत असतो. आराम करणेसाठी तो समुद्राच्या पाण्यावर पोहोतो. आणि केवळ प्रजनन हंगामात समुद्रातील बेटांना भेट देतो. महाराष्ट्राच्या किनारपटटीवर या पक्षाची छायाचित्रीत नोंद आजतागायत केवळ सिंधुदुर्गातील वेंगुर्ला रॉक्स च्या खडकावर आहे.

सदरची कार्यवाही विभागीय वन अधिकरी रत्नागिरी (चिपळूण) श्री दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा) रत्नागिरी (चिपळूण) श्री वैभव बोराटे (अति.कार्य.) यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रकाश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली, श्री. साताप्पा सावंत वनपाल दापोली, तसेच कु. शुभांगी गुरव, वनरक्षक कोंगळे व सर्पमित्र श्री प्रतिक बाईत, व मनित बाईत सर्पमित्र आंजर्ले यांनी पार पाडली आहे.

नागरीकांना यादवारे आवाहान करणेत येते कि, आपले आजुबाजूला अशाप्रकारचे कोणतेही पक्षी आढळुन आल्यास जवळच्या वनविभागास किंवा १९२६ हॅलो फॉरेस्ट या हेल्पलाईन नंबरवर तात्काळ कळवावे. श्री. प्रकाश गणपती पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली