सावंतवाडी । प्रतिनिधी : निरवडे ग्रामपंचायतने विविध अभियानात उल्लेखनीय काम करून विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यामुळे मालेगाव पंचायत समिती जिल्हा वाशिमच्या टीमने अभ्यास दौरा निमित्त निरवडे ग्रामपंचायतला भेट दिली. यावेळी निरवडे सरपंच सुहानी गावडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांनी त्या टीमला गावातील प्रकल्पांसह माहिती दिली.विविध अभियानात उल्लेखनीय काम केलेल्या ग्रामपंचायती मध्ये निरवडे ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबवले आहेत. आणि विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत.त्यामुळे या ठिकाणी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रतिनीधी भेट देऊन माहीती घेतात. पंचायत समिती मालेगाव जिल्हा वाशिम च्या टिमने ग्रामपंचायतीला भेट दिली.
यावेळी सरपंच सुहानी गावडे,उपसरपंच अर्जुन पेडणेकर,ग्रामविकास अधिकारी सुनिता कदम ग्रामपंचायत सदस्य धर्माजी गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी विलास गावडे, शैलेश माळकर संजय शेटकर आदी उपस्थित होते. यावेळी त्या टीमचे उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांनी स्वागत केले. विविध उपक्रमांची माहीती दिली. यावेळी शाळा, अंगणवाडी. सांडपाणी प्रकल्प,कचरा संकलन शेड याची माहीती दिली. समितीने ही समाधान व्यक्त केले.
या समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद लोखंडे, ढोरखडे सरपंच बबनराव मिटकर, ग्रामपंचायत सदस्य मोहन वानखेडे, ग्रामसेवक अमोल जुगाडे, निखिल नारे यांचा टीम मध्ये समावेश होता.