राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन दळवी यांनी व्यक्त केला विश्वास
लांजा (प्रतिनिधी) पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये आजही अनेक दादा, ताई ,साहेब घडवण्याची ताकद आहे .आगामी सर्व निवडणुकीमध्ये याचे चित्र दिसून येईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संभ्रमात न राहता पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन दळवी यांनी केले आहे.
राज्यात घडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन दळवी यांनी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना, आवाहन केले आहे. ते म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे आदरणीय पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतच आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नावाखाली आपली स्वतःची पोळी भाजून घेण्याचा जो खेळ चालू आहे तो आता संपलेला आहे. आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवून देईल.
पक्षाध्यक्ष पवार यांच्या यांच्यामध्ये आजही अनेक दादा, ताई ,साहेब घडवण्याची ताकद आहे. आणि म्हणूनच कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये.
आगामी सर्वच म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा आदी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कोकणात दिसून येईल आणि म्हणूनच जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी खंबीर आणि ठामपणे उभे रहा असे आवाहन शेवटी चेतन दळवी यांनी केले आहे.