सावंतवाडीत २५ रोजी ‘वारकरी मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा’

Google search engine
Google search engine

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्गचे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरात २५ डिसेंबर रोजी वारकरी मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील धनश्री मंगल कार्यालय येथे हा मेळावा संपन्न होणार आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विठ्ठल मंदिर येथे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय अध्यक्ष ह. भ. प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुक्यातील वारकरी संप्रदायांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील वारकरी बांधव सहभागी झाले होते.

यावेळी या वार्षिक मेळाव्याचे नियोजन करण्यात आले.

या मेळाव्यामध्ये सकाळी ९ वाजता सावंतवाडी विठ्ठल मंदिरापासून टाळ मृदंगाच्या गजरात वारकरी दिंडी, नंतर हरिपाठ, वारकरी मेळावा, दिनदर्शिका प्रकाशन व संतसेवा पुरस्कार प्रदान सोहळा असे कार्यक्रम होणार आहेत. सावंतवाडी शहरात प्रथमच भव्य वारकरी मेळावा होणार आहे. तरी सर्व वारकरी बांधवांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे सावंतवाडी तालुका वारकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Sindhudurg