केंद्र शाळा साळशीच्या विद्यार्थ्यांचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश

आर्या गावकर जिल्ह्यात चौथी व रुपाली साटम या दोन्हीची शिष्यवृत्तीधारक म्हणून निवड

शिरगाव (वार्ताहर ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांजकडून सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेस देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा साळशी नं १ या प्रशालेतून इयत्ता पाचवीतून ३ विद्यार्थी बसले होते .यामध्ये आर्या निलेश गावकर हिने २६८ गुण मिळवून जिल्ह्यात चौथी तर रुपाली रुपेश साटम हिने २१० गुण मिळवून जिल्ह्यात ५६ वी येण्याचा मान मिळवला. या दोघींची जिल्हा शिष्यवृत्तीधारक म्हणून निवड झाली आहे.तसेच दर्शना केशव लब्दे हीसुद्धा चांगल्या गुणांनी पास झाली.तसेच या तिन्ही मुलींची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख वर्षा लाड मॅडम,प्रशालेचे मुख्याध्यापक गंगाधर कदम , पदवीधर शिक्षक संतोष मराठे, उपशिक्षिका हेमलता जाधव, वर्गशिक्षिका स्मिता कोदले यांचे मार्गदर्शन लाभले.
विध्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सरपंच वैशाली सुतार , शिक्षक-पालक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर साळसकर व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
सोबत पासपोर्ट फोटो आहेत.