न्यू इंग्लिश स्कूल लांजाचे १८ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत झळकले.

 

लांजा( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे सन २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.या परिक्षेत
न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा संचलित न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजाच्या
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत १० विद्यार्थ्यांनी व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ०८ विद्यार्थ्यांनी अशा एकूण १८ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी – नुपूर अतुल पत्नी, सांची महावीर आलमाने ,भक्ती दत्ताराम गोरे, वेदिका संतोष पाटील,स्वाती अंकुश जाधव, पुर्वा राजेंद्र भूर्के ,अर्णव उमाशंकर जाधव,रूद्र नितीन साळवी, साईराज संदीप पाटील, अनुराग प्रज्योत रामाणे.

माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी – चिन्मय नंदकिशोर कामत, कस्तुरी प्रशांत गोसावी, अनन्या अभिजीत सप्रे,आर्यन विनोद बंडगर, स्वरा मनोज लाखण, अथर्व श्यामसुंदर पाटकर, आर्या नंदकुमार पाटोळे, तेजा उज्जल पवार.

न्यू इंग्लिश स्कूल लांजा ही जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी एक मोठी प्रशाला म्हणून अोळखली जाते.या प्रशालेचा इयत्ता पाचवीचा निकाल ६० टक्के तर इयत्ता आठवीचा निकाल ४८.७८ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकाल वाढल्याने संस्थाचालक व पालकांनी समाधान व्यक्त केले. प्रशालेचे नाव उंचावणा-या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे कार्याध्यक्ष जयवंत शेट्ये ,उपाध्यक्ष सुनिल कुरूप, कार्यवाह विजय खवळे , संस्था पदाधिकारी चंद्रकांत परवडी , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विद्या आठवले उपमुख्याध्यापक सुनिल जाधव सर,पर्यवेक्षक भैरु सोनवलकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.