गुलाल कुणाचा ? ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.!

Google search engine
Google search engine

कणकवली I मयुर ठाकूर : जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे. शनिवारी निवडणूक अधिकारी कर्मचारी पोलीस बंदोबस्तासह मतपेट्या घेऊन मतदान केंद्रांवर रवाना झाले होते. आज १८ डिसेंबर ग्रामपंचायत निवडणूकीचा दिवस. अगदी काही क्षणात मतदानाला सुरुवात होणार होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. अगदी सुरळीतपणे प्रशासन यंत्रणा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागलेली दिसून येते.

Gulal whose? Voting for Gram Panchayat election has started!

सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील वेगळीच उत्सुकता दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षानी आपली ताकद लावून उमेदवार निवडून आणण्याची परीक्षा दिली होती. मात्र त्या परीक्षेचा निकाल २० तारीख ला लागणार असल्याने एक रंगतदार निवडणूक प्रक्रिया आता पासून सुरू होत आहे.