शिरगांव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम

 

तेजस सुतार व सई सावंत शिष्यवृत्तीस पात्र

शिरगाव (वार्ताहर ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत सन २०२२-२३ साठी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेत शिरगाव हायस्कूलचे तेजस सुतार व सई सावंत यांनी यश संपादन करून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.या प्रशालेतील पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.यापैकी तेजस सुरेश पवार याने ७२.६६ टक्के गुण मिळवून ग्रामीण सर्वसाधारण यादीत जिल्ह्यात ३७ वा आला आहे.
तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत या प्रशालेतून ६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी सई राजेंद्र सावंत हिने ५४ टक्के गुण मिळवत ग्रामीण सर्वसाधारण यादीत तालुक्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
या विद्यार्थ्यांना या प्रशालेतील सहाय्यक शिक्षक विठोबा लब्दे,धाकलू डवरी,स्नेहा कांदळगावकर, सरस्वती थुरी,बाळू पाटील, सुचिता कदम,नामदेव गांगुर्डे, कृष्णा कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
या त्यांच्या यशाबद्दल शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले,संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी,प्राचार्य एस.एन.अत्तार, पर्यवेक्षक उदयसिंह रावराणे,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
सोबत पासपोर्ट साईज फोटो आहेत.