ऑनलाईन ड्रेस मागविताना महिलेची 32,135 रूपये रकमेची झाली ऑनलाईन फसवणुक
देवगड : प्रतिनिधी
ऑनलाईन ड्रेस मागविताना महिलेचे ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
जामसंडे विष्णुनगर येथील रहिवाशी व भाजपाचा नगरसेविका साै.आद्या अमेय गुमास्ते यांची 32,135 रूपये अज्ञात व्यक्तिने ऑनलाईन ट्रांजेक्शन करून काढून घेवून फसवणूक केल्याचा प्रकार शनिवार दि.15 जुलै राेजी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत झाला.याप्रकरणी आद्या गुमास्ते यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी अज्ञात व्यक्तिविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, जामसंडे विष्णुनगर येथील साै.आद्या गुमास्ते यांनी दि 4 जुलै राेजी एका साईटवरून ऑनलाईन ड्रेस मागविला हाेता.मात्र 12 जुलै राेजी आलेल्या पार्सलमध्ये ड्रेसऐवजी फोल लावलेली साडी व चिंध्या आल्या.त्यांना पसंत नसल्याने ते पार्सल परत पाठविले व कॅश ऑन डिलीव्हरीनुसार दिलेले 799 रूपये रिफंड करण्यासाठी एस्एम्एस् केला यावेळी त्यांना एक फॉर्म भरण्यास सांगीतले. फॉर्म भरल्यानंतर व पैसे रिंफड करण्यासाठी एस्एम्एस् केल्यानंतर त्यांनी शनिवारी पैसे रिंफड झाले का याबाबत चेक केले असता पैसे रिंफड न हाेता 32,135 रूपये रक्कम अज्ञात व्यक्तिने ऑनलाईन ट्रांजेक्शन करून काढून घेतले व फसवणुक केल्याचे त्यांचा निदर्शनास आले.त्यांनी याबाबत देवगड पाेलिस स्थानकात तक्रार दिली असून पाेलिसांनी अज्ञात व्यक्तिविराेधात भादवि 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 ड अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास पाेलिस निरिक्षक निळकंठ बगळे करीत आहेत.