परिवर्तन अटळ : भाजप पदाधिकाऱ्यांचा विश्वास
सावंतवाडी: माजगाव ग्रामपंचायतील भाजप बाळासाहेबांची शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडीत काटेकी टक्कर होत आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सकाळपासूनच मतदारांचा उत्सुर्त प्रतिसाद मिळत आहे. या लढतीत बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून युतीच्या डॉ. अर्चना अजय सावंत यांच्यासह भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
भाजप जिल्हा चिटणीस मनोज नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रेश्मा सावंत तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी ही डॉ. अर्चना सावंत यांच्यासह युतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
यावेळी युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार डॉ. अर्चना सावंत, भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत, पिंट्या देसाई यांसह भाजप व बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व बुथवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sindhudurg