खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील पुष्कर केमिकल ऍण्ड फर्टीलायझर लिमिटेड कंपनीच्या स्टोअर्सच्या मागील आवारातून ८७ हजार ८६८ रूपये किंमतीचे लोखंडी साहित्य चोरीप्रकरणी दोघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र रामचरित्र पटेल (३२), सोनुकुमार हमीद नट (२३) अशी संशयितांची नावे आहेत. हे दोघेही कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामाला आहेत.
१२ जुलै रोजी हे दोघेजण कंपनीच्या स्टोअरच्या मागील बाजूस संशयास्पदरित्या वावरत होते. ही बाब कंपनीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आली. रात्री १०.२० च्या सुमारास हे दोघेजण लोखंडी साहित्य घेवून पळून जाताना दिसून आले. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.