रांगणा तुळसुली येथे भारतीय जनता पार्टीची टिफिन बैठक संपन्न.

 

कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती.

देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला यशस्वीरीत्या ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात मोदी@९ उपक्रम राबविला जात आहे.

या अभियानांतर्गत आज रांगणा तुळसुली बूथ क्रमांक-१९२ येथे माजी खासदार तथा कुडाळ-मालवण विधानसभा प्रभारी मान.निलेशजी राणे साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत ‘टिफिन बैठक’ पार पडली. या बैठकीदरम्यान निलेश राणे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत तालुक्यात सुरू असलेल्या मोदी @९ अभियानाचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले. गेला महिनाभर कुडाळ मालवण मतदारसंघात मोदी @९ अभियान अंतर्गत हर घर संपर्क अभियान राबविले जात आहे त्याचाही आढावा निलेश राणे यांनी यावेळी घेतला. यावेळी कुडाळ तालुक्यातील सुरू असलेल्या अभियानाचे कौतुक करत सर्वांचे अभिनंदन केले. उपस्थित कार्यकर्यांसोबत स्नेह भोजन झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.

या बैठकीसाठी कुडाळ व ओरोस मंडलातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, बूथ अध्यक्ष, तालुक्यातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.