मांगेली धबधबा येथे रविवार असल्याने वर्षा पर्यटनासाठी हजारों पर्यटक

दोडामार्ग | सुहास देसाई : दोडामार्ग तालुक्यातील मांगेली येथील धबधबा पाहण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे या गोवा ,कर्नाटक येथील हजारो पर्यटक भेट देतात रविवारी सुट्टी असल्याने आज मोठ्या प्रमाणात पर्यटक मांगेली फणसवाडी येथील धबधबा ठिकाणी दाखल झाले. त्यामुळे परिसर पर्यटकांनी रस्ता वाहतुकीसह या सर्व परिसरात पर्यटकांची वर्दळ मोठी होती मांगेली परिसरातील निसर्ग रम्य डोंगर धुके घनदाट जंगल तसेच सडा येथील किल्ला ठिकाणी आदी वर्षा पर्यटनासाठी देखील पर्यटक याना वेगळाच अनुभव मिळतोय. मांगेली धबधबा हाऊस फुल्ल झाल्याचे दिसून आले तर काही पर्यटक यांनी तिलारी तेरवण मेढे धरण परिसरात हजेरी लावतात. तर काही जण तिलारी घाटमाथ्यावर देखील तेथील निसर्ग रम्य परिसर तिलारी व्हॅली जंगली प्राणी पक्षी निरीक्षण करण्यास जातात

दोडामार्ग तालुक्यातील मांगेली धबधबा पाहण्यासाठी तसेच मौजमजेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक मांगेली गावात दाखल होतात. त्या मुळे सर्व ग्रामस्थ नागरीक त्यांचे स्वागत करतांना अनेक रानमेवा भाजी ऊपलब्ध करुन देतात त्याला मोठी गर्दी असते पावसाळ्यात दोन अडीच महिने पर्यटक शनिवारी रविवार मांगेली गावात येतात वर्षा पर्यटनाचा आंनद घेतात यात गोवा येथील पर्यटक यांचा मोठा भरणा असतो शिवाय दोडामार्ग तालुक्यातील स्थानिकांचा तसेच कर्नाटक चोर्ला, कणकुबी, जांबोटी बेळगाव, येथील काही जण चोर्ला सडा येथून मांगेली येथे येतात. रविवारी मांगेली येथे मोठी गर्दी बघायला मिळाली.
गोवा राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात कर्नाटक येथील पर्यटक असतात गोवा येथील पर्यटक यांच्या माध्यमातून वरील राज्यातील पर्यटक यावेळी मांगेली गावात दाखल झाले. रविवारी साप्ताहिक सुट्टी त्यामुळे मांगेली धबधबा वाहन पार्किंग फुल झाले होते. नंतर मिळेल तिथे रस्ता बाजूला गाड्या उभ्या केल्या गेल्या होत्या.
मांगेली धबधबा हा कर्नाटक सडा चोर्ला हद्दीतून कोसळतो सडा माळरानावर जंगलातील पाणी हे धबधबा रूपाने महाराष्ट्र हद्दीत पडते उंचावरून पडणारे पाणी धबधबा बनला आहे. या ठिकाणी अद्याप कुठल्याही पर्यटन सुविधा नाही लोकांना चालत जावे लागते. अनेक हौशी पर्यटक पाणी पडत असलेल्या ठिकाणी जाऊन मौजमस्ती करताना दिसत होते येथील दगड धोकादायक निसरडे असताना जीव धोक्यात घालूनमजा करत असतात यात मोठ्या संख्येने महिला युवक युवती जेष्ठ नागरिक सह कुटुंब मांगेली धबधबा येथे दाखल झाले होते.
मांगेली धबधबा येथे जाण्यासाठी रस्ता संपूर्ण डांबरीकरण झाला आहे या ठिकाणी हिरवेगार डोंगर धाट धुके, तिलारी धरणाचा दिसणारा जलाशय कसर्ईनाथ डोंगर येथील निसर्ग पर्यटकांना भुरळ घालत होते अनेक जण फोटो सेल्फी काढून येथील आठवणी जतन करताना दिसत होते.
मांगेली धबधबा येथे रविवारी सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार असल्याने दोडामार्ग पोलिसांनी या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता.
स्थानिक ग्रामस्थांनी रोजगार मिळावा यासाठी या ठिकाणी छोटी छोटी दुकाने थाटली होती त्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता शिवाय मांगेली गावातील काही ग्रामस्थ जंगली मेवा रानभाज्या केळी घेऊन विक्री करताना दिसत होत्या पावसाळ्यात गावठी रानभाज्या ही एक पर्वणी असते. या ठिकाणी मोठ्यप्रमाणावर रोजगानिर्मिती होत असून पायाभूत सुविधांची वानवा असल्यामुळे काही वेळा गैरसोय होत असून या ठिकाणी नव्याने योजना तयार करून राबविण्याची आवश्यकता आहे तरच भविष्यात
पर्यटनाचा आनंद लाखों पर्यटक घेऊ शकतात यसाठी पर्यटन पॅकेज जाहीर करण्याची मागणीपरिसरातून होत आहे
फोटो
मांगेली धबधबा येथे रविवारी सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक यांची झालेली गर्दी
निसर्ग रम्य परिसर
छाया सुहास देसाई दोडामार्ग