मेसीचे स्वप्न साकार : तब्बल ३६ वर्षांनी जिंकला वर्ल्ड कप
मेरॅडॉनानंतर मेसीने मिळवून दिला अर्जेंटिनाला विजय
कतार : फिफा वर्ल्ड कप च्या अंतिम सामन्यात गत विजेत्या फ्रान्सवर पेनल्टी शूट आउट मध्ये ४ – २ अशी मात करीत अर्जेंटिना पुन्हा एकदा जगज्जेता झाला. तब्बल ३६ वर्षांनंतर अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्ड कप जिंकून आपल्या चाहत्यांना अनोखी भेट दिली. लिओनाल मेसीने या सामन्यात २ गोल केले. तर त्याचाच क्लब मधील सहकारी किलीयन एम्बापेने ऐतिहासिक हॅट्रीक केली. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सामना ३-३ बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी शूटआउट मध्ये अर्जेंटीनाने ४ – २ अशा फरकाने विजय संपादित केला.
Sindhudurg