संघ हरला तरी तो ठरला ‘बाजीगर ‘

Google search engine
Google search engine

अंतिम सामन्यात ‘एमबाप्पे ची हॅट्रिक

पेनल्टी शुटआऊटमध्ये मात्र भंगलं स्वप्न

कतार : फिफा वल्डकपमध्ये पेनल्टी शूटआउट मध्ये फ्रान्सला पून्हा जगज्जेता ठेवण्याचं एमबाप्पेचं स्वप्न भंगलं मात्र

एमबाप्पे गोल्डन शूजचा मानकरी ठरला.

किलीयन एमबाप्पे याला गोल्डन शूजचा मान देऊन गौरवण्यात आलं. यासाठी मेस्सी आणि त्याच्या मध्ये रस्सीखेच होती. तर, मेस्सीला गोल्डन बॉल देऊन गौरविण्यात आले.

वर्ल्डकप जिंकण्यासाठी एमबाप्पेनं जिवाचं रान केलं. फायनलच्या मॅचमध्ये अर्जेंटिनाकडून पहिल्यापासून आक्रमक सुरुवात करण्यात आली होती. अर्जेंटिनानं दोन गोल करत आघाडी घेतली होती. फ्रान्सला एमबाप्पेनं कमबॅक करुन दिलं. मॅचच्या ८० व्या मिनिटाला एमबाप्पेनं पहिला गोल केला. तर ८२ व्या मिनिटाला दुसरा गोल केला.

त्यामुळं निर्धारित वेळेत अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील सामना बरोबरीत होता. अतिरिक्त वेळेत देखील मेस्सीनं १०८ व्या मिनिटाला अर्जेंटिनाकडून गोल केला यामुळं फ्रान्स पिछाडीवर पडला. मात्र, ११८ व्या मिनिटाला एमबाप्पेनं तिसरा गोल केला आणि मॅच पेनल्टी शुट आऊटमध्ये गेली. पेनल्टी शुट आऊटमध्ये फ्रान्सला पराभवाचा सामना करावा लागला. अर्जेंटिनानं ४-२ असा सामना जिंकला.

Sindhudurg