कोण होणार गावचा कारभारी ? काही क्षणात होणार जाहीर.!
सुरुवतीला पोस्टल मतांची होणार मोजणी..!
कणकवली I मयुर ठाकूर : कणकवली
तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती व ४९ सरपंचपदासाठी ६६.५६ टक्के मतदान झाले असून कणकवली तालुक्यात एकूण पुरुष- ४१०१८ व स्त्रीया ४२०९१ अशा एकूण ८३, १०९ मतदारांपैकी २९०१९ पुरूष व २६२९८ स्त्रीया अशा मिळून ५५३१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.आज मतमोजणी होणार असून उमेदवारांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.
कणकवली तालुक्यात कसवण- तळवडे येथे सर्वाधिक ८३.४५ टक्के तर तालुक्यात सर्वात कमी मतदान नडगिवे या गावात ५२.९६ टक्के मतदान झाले आहे.
Big Breaking | Counting of votes begins in Kankavli; The intimidation of the candidates increased
कणकवली तालुक्यात झालेल्या मतदानात कलमठ – ५६३१ पैकी ३९६५ (७०.४१ टक्के), आशिये- ९०७ पैकी ६९५ (७६.६३ टक्के), वरवडे – २२९१ पैकी १६८३ ( ७३.४६ टक्के), बीडवाडी – १६९१ पैकी ११२३ (६६.४१ टक्के), सावडाव – १०७५ पैकी ७४५ (६९.३० टक्के), तरंदळे- १३२९ पैकी ८३१ (६२.५३ टक्के), बोर्डवे – १४७५ पैकी ९५० (६४.४१ टक्के), कसवण-तळवडे- १२८७ पैकी १०७४ (८३.४५ टक्के), आयनल- ८०६ पैकी ५४७ (६७.८७ टक्के), कोळोशी- ७१६ पैकी ४८१ ( ६७.१८ टक्के), दारूम – ५७० पैकी ४५३ ( ७९.४७ टक्के), दारिस्ते – ९०९ पैकी ५७५ (६३.२६ टक्के), शिवडाव २०१३ पैकी १३७५ (६८.३१ टक्के), करूळ- ४१४ पैकी २९९ (७२.२२ टक्के), कोंडये- ६६० पैकी ४९२ (७४.५५ टक्के), चिंचवली ४११ पैकी ३१२ ( ७५.९१ टक्के), कुरंगवणे – बेर्ले- ९८० पैकी ५५३ (५६.४३ टक्के), कासरल- ६८० पैकी ५६५ (८३.०९ टक्के), सातरल- ४११ पैकी ३२७ (७९.५६ टक्के), साकेडी- ४०१ पैकी २४२ (६०.३५ टक्के), हुंबरठ- ८०३ पैकी ५७० (७०.९८ टक्के), डामरे – ५७३ पैकी ४१९ ( ७३.१२ टक्के), तिवरे- ७८६ पैकी ५७६ (७३.२८ टक्के), साळीस्ते- ६७६ पैकी ४६६ (६८.९३ टक्के), पियाळी- ८६३ पैकी ५६१ (६५.०१ टक्के), वाघेरी- ८७६ पैकी ७११ (८१.१६ टक्के), शिरवल- ९५४ पैकी ६५१ (६८.२४ टक्के), हळवल – १४९३ पैकी ११७९ (७८.९७ टक्के), नडगिवे- ११५० पैकी ६०९ (५२.९६ टक्के), माईण- ५६५ पैकी ३४१ (६०.३५ टक्के), शेर्पे- ७३२ पैकी ३८९ (५३.१४ टक्के), नरडवे १९९८ पैकी १२३४ (६१.७६ टक्के), दिगवळे- १३५५ पैकी ८४८ (६२.५८ टक्के), लोरे १७६२ पैकी १२३० (६९.८१ टक्के), घोणसरी- १८२५ पैकी १३०७ (७१.६२ टक्के), हरकुळ खुर्द- २३९४ पैकी १५११ (६३.१२ टक्के), तळेरे- १८०५ पैकी १०८४ (६०.०६ टक्के), करंजे- ११०७ पैकी ६७७ (६१.१६ टक्के), कुंभवडे- ९१३ पैकी ६४४ (७०.५४ टक्के), नागवे- १२०१ पैकी ७३४ (६१.१२ टक्के), जानवली- १७९६ पैकी १३३६ ( ७४.३९ टक्के), असलदे- ९३९ पैकी ६९४ (७३.९१ टक्के), ओसरगांव- १६८९ पैकी १२७५ (७५.४९ टक्के), हरकुळ बुदुक- ३४८३ पैकी २१५९ (६१.९९ टक्के) कळसुली २६०४ पैकी १६३० (६२.६० टक्के), नाटळ – २५९० पैकी १५१४ (५८.४६ टक्के), नांदगाव- २६२८ पैकी १८६८ (७१.०८ टक्के), सांगवे- २६२३ पैकी १५८९ (६०.५८ टक्के), खारेपाटण – ३०७२ पैकी २०५५ (६६.८९ टक्के), कासार्डे ३७१२ पैकी २२९८ (६१.९१ टक्के), वागदे २०७८ पैकी १६०९ (७७.४३ टक्के), फोंडाघाट- ७४०७ पैकी ४२६२ (५७.५४ टक्के) तालुक्यात एकूण पुरुष- ४१०१८ व स्त्रीया ४२०९१ अशा एकूण ८३ हजार १०९ मतदारांपैकी २९०१९ पुरूष व २६२९८ स्त्रीया अशा मिळून ५५३१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यामुळे ४८ सरपंच पदासाठी ११८ तर ५२ ग्रामपंचायतीच्या ३५२ सदस्य पदासाठी ७३५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे