जनतेने माझ्या कामावर, माझ्यावर ठेवलेला विश्वास आज सार्थकी लागला..!

Google search engine
Google search engine

भाजपच्या विजया नंतर आम. नितेश राणेंनी टिकाकारांना दिले प्रत्युत्तर..!

कणकवली I मयुर ठाकूर : विरोधकांचे दुकानच माझ्यावरच चाललेलं असल्यामुळेच. ते माझ्यावर आरोप करत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोपांचे उत्तर माझ्या जनतेने निवडणुकीच्या माध्यमातून दिलेले आहे. जेव्हा अधिकाराने मी माझ्या मतदारांशी,जनतेशी बोलतो तेव्हा त्यात आरोप करण्यासारखं काहीच नसतं. मी एक कुटुंब प्रमुखासारखा त्या जनतेशी बोलत असतो. मी दोन वेळा निवडून आलेला आमदार आहे. जनतेने माझ्या कामावर, माझ्यावर ठेवलेला विश्वास आज सार्थकी लागला, जेव्हा अधिकाराने जनतेशी बोलतो तेव्हा त्यांना वाईट वाटत नाही. हक्काने आमचा माणूस आमच्याशी बोलतो असं त्यांना वाटतं त्याचं उत्तर त्यांनी आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून दिलेल आहे. असं आमदार नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

People's faith in my work, in me, became worthwhile today..!

सगळीकडे उद्धव ठाकरेची शिल्लक सेना आहे. कुठे दोन आकड्यापर्यंत पण पोहोचलेली नाही. ही त्यांची उरली सुरली लायकी आहे. उर्वरित ज्या ग्रामपंचायत आहेत ज्या आम्ही हरलो आमच्या चुकांमुळे पराभूत झालो ते स्वतः जिंकलेले नाहीत. पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये काय वेगळं करायचं ते आम्ही करू आणि शंभर टक्के भाजप यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.