मुंबई – गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाक्याजवळ ट्रॅव्हल जळून खाक.!

Google search engine
Google search engine

सुदैवानं जीवितहानी टळली ; ३५ प्रवासी सुखरुप बचावले..!

कणकवली I मयुर ठाकूर : आज सकाळी ६ वा. च्या सुमारास पुणे ते सावंतवाडी जाणाऱ्या केळकर ट्रॅव्हल्स गाडी क्रमांक एम. एच. १२ के. क्यू. ५७६९ या प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स ला ओसरगाव टोल नाक्याजवळ आग लागली. ही आग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदरची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या गाडीत ३५ प्रवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व प्रवासी सुखरूप आहेत. तसेच मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी वाहतूक पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती.

On the Mumbai-Goa highway, travel got burnt near the Osargaon toll booth.

आग विजविण्यासाठी नगरपंचायत कणकवली चा अग्निशमन बंब बोलविण्यात आला. मात्र तत्पूर्वी बस जळून खाक झाली होती.