शतप्रतिशत भाजपा हेच लक्ष ; माजी उपसभापती राजू परुळेकर
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत पैकी एक असलेल्या मठबुद्रुक ग्रामपंचायतीवर माजी उपसभापती राजू परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने झेंडा फडकवला आहे.
सरपंचपदी मोहन सदाशिव वेंगुर्लेकर, सदस्य विनायक बाईत, लीना बाईत, उदय सावंत, विद्या मेस्त्री हे विजयी झाले. तर तीन सदस्य यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत.
भाजप व राणे साहेब यांच्या विचारांचा हा विजय आहे. झालेल्या विकास कामांचा हा विजय आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकसंघ केलेल्या कामामुळे भाजपने तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर यश मिळवले. आगामी काळात गावागावात पक्ष संघटना अधिक मजबूत करत. पंचायत समिती, जिल्हा परीषद, २०२४ विधानसभा निवडणुकीत शतप्रतिशत भाजपा हेच लक्ष असल्याचे माजी उपसभापती राजू परुळेकर यांनी सांगितले.