ह.भ.प.सिताराम परब, ह.भ.प.गणपत पांचाळ, ह.भ.प.रामचंद्र गाड हे यावर्षीचे मानकरी
कणकवली (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग च्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे मानाचे संतसेवा पुरस्कार२०२२ यावर्षी ह.भ.प.सिताराम परब आंब्रड ता.कुडाळ,ह.भ.प.गणपत पांचाळ आखवणे ता.वैभववाडी, ह.भ.प.रामचंद्र गाड सासोली ता.दोडामार्ग यांना जाहीर करण्यात आले.
आज झालेल्या पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत पुरस्कारासाठी आलेल्या अर्जातून यांची निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग चा जिल्हा मेळावा रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ सावंतवाडी येथे होत असून या मेळाव्यात हे पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहेत. या निवडीच्या वेळी जिल्हा सचिव श्री राजू राणे, खजिनदार मधुकर प्रभुगावकार उपस्थित होते.