दोडामार्गात भाजपचे १४ सरपंच जाहीर ; जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली माहिती

दोडामार्ग | सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यातील पहिल्यांदा जनतेतून निवडून आलेल्या नवनिर्वाचीत २८ सरपंचां पैकी १४ ग्रामपंचायतीचे सरपंच भाजपचे असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज दोडामार्ग मणेरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले सिंधुदूर्ग जिल्ह्यात भाजप पक्ष आघाडीवर आहे. दोडामार्ग तालुक्यातील व गावच्या विकासाला चालना देण्यासाठी जनतेने भाजपला स्वीकारले आहे. त्यामुळे निवडणुकीत जो जनतेचा विश्वास आम्हीं संपादन केला आहे तो सार्थकी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करत तालुक्यांत रखडलेली विकास कामे त्याचं बरोबर आडाळी एम आय डी सी तिलारी पर्यटन रोजगार निर्मिती प्रकल्प मार्गी पाठपुरावा करणार असल्याचं पत्रकार परिषदेतुन जाहिर केले.

दोडामार्ग शॅलोट पॅलेस येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, राजेद्र म्हापसेकर माजी जिल्हा बँक प्रकाश गवस, भाजपा कार्यकर्ते चंदू मळीक, रमेश दळवी दादू कविटकर तसेच नावनिर्वाचीत सरपंच उपस्थित होते.
यावेळी राजन तेली म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हात भाजपने आपले वर्चस्व राखले आहे. हा झणझणीत विजय म्हणजे भाजपवर जनतेचा दाखविलेला विश्वास आहे. त्या प्रमाणे लोकांच्या अपेक्षा देखील आहेत. विकासाला चालना देण्यासाठी जनतेने भाजप पक्षाला निवडले. त्यामुळे जनतेने आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्हीं प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.

राज्याचेसार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे जिल्ह्याचे सुपुत्र आणि पालकमंत्री असल्याने त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणार. तळागाळातील गावांमध्ये विकासात्मक धोरण राबवून लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. राजन तेली यांनी भाजपच्या वतीने घोषित केलेले सरपंच आडाळी सरपंच पराग गावकर, परमे-पंतूर्ली सरपंच प्रथमेश मणेरीकर, मोरगाव सरपंच संतोष आईर, कळणे सरपंच अजित देसाई, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले, बोडदे- खानयाळे हरिश्चंद्र नाईक, उसप सरपंच सुचिता गवस, वझरे-गीरोडे सरपंच सुदेश गवस, तळेखोल सरपंच वंदना सावंत, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, माटणे सरपंच महादेव गवस, तसेच फुकेरी ग्रामपंचायतची पूर्ण ग्रामपंचायत सदस्य भाजपकडे असल्याचे त्यांनी संगितले. व ग्राम विकास आघाडीचे सरपंच भाजपा कडे येतील असा विश्र्वास व्यक्त केला.

आडाळीत लवकरच रोजगार निर्मिती प्रकल्प आणणार ; तालुक्यातील रोजगार प्रश्न सुटणार!!
तालुक्यातील बहुचचित आडाळी एम आय डी सीत लवकरात लवकर उद्योग आणले जातील. यासाठीची भुखड वाटप प्रक्रिया सुरू झाली आहे तर तिलारी येथे पर्यटनात्मक रोजगार उपलब्ध करून लोकांना त्याचे भेट स्वरूपात देणार असल्याचे सांगून पुनवर्सन क्षेत्रातील समस्या सोडवाव्यात याबाबत आपण प्रयत्नशील असल्याची माहिती राजन तेली यांनी दिली