26 जानेवारीला दिल्ली च्या राजपथवर सादर करणार दिवली नृत्य ; आचरा वासियांनकडून जल्लोषात स्वागत
आचरा | अर्जुन बापर्डेकर
मालवण तालुक्यातील आचरा कॉलेजच्या मुलांना 26 जानेवारी 2023 रोजीच्या दिल्ली येथे होणारया कार्यक्रमात दिवली नृत्य सादर करण्याचा बहुमान मिळाला आहे. दिल्ली येथे झालेल्या मेघा फायनल राउंडमधून संपूर्ण भारतातून आलेल्या एकूण 225संघांमधून हि निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल दिल्ली हून मुले आचरेयेथे दाखल होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य जेरान फर्नांडिस, जयप्रकाश परुळेकर, अर्जुन बापर्डेकर, विद्यानंद परब,निलेश सरजोशी. ,वामन आचरेकर, मांगिरीष सांबारी,रुपेश साटम,हर्षद धुरी,भरत पटेल,पंकज आचरेकर,महेश शेटये,नंदकिशोर सावंत, प्रफुल्ल घाडी,यांसह बहुसंख्येने आचरावासिय उपस्थित होते.
प्रसिद्ध कोरिओग्राफर प्राची राणे यांनी आचरा कॉलेजच्या मुलांना गोवा येथील दिवली नृत्य बसविले होते.सदर नृत्याने
मुंबई विद्यापीठ राज्यस्तरीय युवा महोत्सवाबरोबरच स्थानिक स्पर्धांमधूनहि घवघवीत यश मिळविले होते. या आचरा कॉलेजच्या डान्स गृपला २६ जानेवारीला राजपथ संचलनात सादर होणा-या वंदे भारतम कार्यक्रमात तीन फेरयांमधून दिल्ली येथे झालेल्या मेघा फायनल राउंडमधून निवड केली गेली आहे.या दिल्ली प्रवासासाठी माजी खा निलेश राणे ,रामेश्वर देवस्थान समिति तसेच आचरावासियांकडून आर्थिक मदत देण्यात आली होति.आचरा कॉलेजच्या या डान्स गृप मध्ये
हर्षाली लाड, स्नेहल देसाई, तनुजा देसाई, मयुरी मुणगेकर, साक्षी लाड, करीना खराडे, गौरव लाड, हर्षद मेस्त्री, रितेश गोलातकर या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.